अभिनेत्री श्रीलीला करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण; ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यासोबत दिसणार मुख्य भूमिकेत

Sreeleela In Bollywood | अभिनेत्री श्रीलीला ‘पुष्पा 2’ मधील ‘किसिक’ गाण्यामुळे चांगलेच चर्चेत आली. यातील तिच्या डान्सने चाहत्यांना घायाळ केले. या गाण्यामुळे मिळालेल्या लोकप्रियतेनंतर आता श्रीलीला बॉलीवूडमध्ये डेब्यु करणार आहे. कार्तिक आर्यनसोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे म्हंटले जात आहे.
‘पुष्पा 2’ मधील ‘किसिक गाण्यामुळे श्रीलीलाच्या अभिनयाची आणि मोहकतेची चर्चा होऊ लागली आणि त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये संधी मिळवण्याच्या मार्गावर आहे. आता तिला कार्तिक आर्यनसोबत एका रोमँटिक चित्रपटात लीड रोल मिळाला आहे, ज्यामुळे तिच्या आगामी बॉलिवूड डेब्यूसाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
या चित्रपटाचे पहिले नाव ‘आशिकी 3’ ठेवण्यात आले होते, परंतु काही वादांमुळे ते बदलण्यात आले आहे. चित्रपटाच्या नवीन नावाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सुरुवातीला या चित्रपटात तृप्ती डिमरीला या भूमिकात घेणयात आले होते, परंतु काही कारणास्तव तिला हा प्रोजेक्ट सोडावा लागला. यानंतर श्रीलीलाला या प्रोजेक्टबाबत विचारताच तिने लगेचचं होकार दिला. श्रीलीला आणि कार्तिक आर्यन यांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
View this post on Instagram
याशिवाय, श्रीलीला इब्राहिम अली खानसोबत एक मॅडॉक फिल्म्सच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. श्रीलीला आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताना आपल्या करिअरच्या नव्या टप्प्यावर पोहोचली आहे.
श्रीलीलाने चित्रपटसृष्टीत आपली कारकीर्द 2017 साली ‘चित्रांगदा’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरू केली होती. तिचा अभिनय आणि डान्स कौशल्य यामुळे तिला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
हेही वाचा:
अजय देवगणने 18 वर्षांपासून ‘या’ दिग्दर्शकासोबत संवादच साधला नाही, नक्की कारण काय?





