मुंबई – साऊथचा स्टार नागा चैतन्यला बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला डेट करत असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सांमथापासून विभक्त झाल्यानंतर या दोघांचे नाव सतत चर्चेत राहिले आहे. मात्र नुकतेच शोभिताने नागा चैतन्यला डेट करत असल्याच्या वृत्तावर भाष्य केले आहे. लोकांनी तिच्या खासगी आयुष्यापेक्षा तिच्या कामाबद्दल जास्त चर्चा केली पाहिजे, असे परखड मत तिने व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीत शोभिता म्हणाली की, “प्रेक्षकांनी माझ्या खासगी लाइफपेक्षा प्रोफेशनल लाइफबद्दल बोलले तर मला जास्त आनंद होईल. मला इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. जर तुम्ही मला ओळखत आहात, तर माझ्या गुणांना, कठोर परिश्रम आणि कलेसाठी ओळखा. जे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. लोक माझ्या खासगी आयुष्याबद्दल कसे बोलू शकतात? पण स्पष्ट सांगायचे झाले तर मला याचा काहीही फरक पडत नाही.”
यावेळी तिने होणारा पती कसा असावा याबाबतही सांगितले आहे. मातीशी जोडलेला पती हवा असल्याचे तिने सांगितले. “तुम्ही जीवनात कितीही प्रगती केली तरी नम्र असले पाहिजे. साधेपणा, चांगले मन, इतरांबद्दल दयाळूपणा असला पाहिजे. आयुष्य खूप लहान आहे हे समजून घेऊन जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे,” असेही शोभिता म्हणाली.
वर्कफ्रेंडबद्दल बोलायचे झाले तर, शोभिता धुलिपा ‘मेड इन हेवन’ या सिरिजमधील मुख्य भूमिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आली. शेवटची ती ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये झळकली आहे. लवकरच ती आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूरसह ‘द नाइट मॅनेजर पार्ट 2’मध्ये दिसणार आहे. येत्या 30 जूनला डिस्नी प्लस हॉटस्टार ही वेबसिरिज पाहता येणार आहे.