Sapna Choudhary : अभिनेत्री ‘सपना चौधरी’ दुसऱ्यांदा झाली आई; बारशाला आली तब्बल 30 हजार लोकं !

Sapna Choudhary : हरियाणवी डान्सर ‘सपना चौधरी’ने पुन्हा एकदा चाहत्यांना हैराण केले आहे. अभिनेत्री पुन्हा आई बनली आहे, ज्याचा खुलासा तिने स्वतः एका स्टेज शोमध्ये केला होता. हा अभिनेत्रीचा दुसरा मुलगा आहे.
सपनाने पहिल्या मुलाचे नाव ‘पोरस’ ठेवले होते आणि दुसऱ्या मुलाचे नाव देखील पंजाबी गायक बब्बू मान यांनी सपना आणि तिचा पती वीर साहू यांच्या उपस्थितीत उघड केले होते.
पहिल्या प्रेग्नेंसीनंतर सपना चौधरीने आता तिची दुसरी प्रेग्नेंसीही चाहत्यांपासून लपवून ठेवली आहे. आता सपना चौधरी तिचा पहिला मुलगा चार वर्षांचा झाल्यानंतर दुसऱ्यांदा आई झाली असून तिच्या मुलाचे नाव ‘शाह वीर’ असे आहे.
पंजाबी गायक बब्बू मान यांनी रंगमंचावर सपना चौधरी आणि वीर साहू पुन्हा आई-वडील झाल्याची माहिती दिली. यामध्ये सपना चौधरी डोक्यावर सूट आणि स्कार्फ घालून उभी होती, तर वीर साहू पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला दिसत होता.
समोर हजारोंचा जमाव होता. मग बब्बू मानने घोषणा केली की सपना आणि वीरला दुसरा मुलगा आहे. बब्बू मानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सपना आणि वीर यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव 11 नोव्हेंबर रोजी ठेवले. बब्बू मानचा हा कार्यक्रम हरियाणातील मदनहेडी गावात पार पडला. जिथे पंजाब आणि हरियाणवी इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स पाहुणे म्हणून आले होते.
या कार्यक्रमात 30 हजार लोक आले होते. ज्यामध्ये बब्बू मानने लाईव्ह परफॉर्मन्स दिला होता. सपनाचा दुसरा मुलगा शाह वीर याचे नाव सांगताच उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि शिट्ट्या वाजवल्या.
सपना चौधरी आणि वीर साहू यांनी 2020 मध्ये गुपचूप लग्न केले होते आणि त्यानंतरच त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी सपनाने तिची प्रेग्नेंसी लपवून ठेवली होती आणि यावेळीही तेच केले.





