Sanchita Ugale Death : ‘ती काही महिन्यांपासून नैराश्यात होती’; संचिता उगलेच्या मैत्रिणीचा मोठा दावा
Sanchita Ugale Death : २२ वर्षीय टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले हिच्या कथित आत्महत्येप्रकरणी आता एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Sanchita Ugale Death : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale ) यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाबाबत पोलीस तपास सुरू असतानाच त्यांची मैत्रीण आणि सहअभिनेत्री मेघा शर्मा यांनी काही महत्त्वाचे दावे केले आहेत. ‘मनीकंट्रोल’शी बोलताना मेघा शर्मा यांनी संचिता काही महिन्यांपासून नैराश्याचा सामना करत असल्याचे सांगितले. (Sanchita Ugale Death)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता उगले या नालासोपारा येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळावर कोणतीही चिठ्ठी (सुसाइड नोट) सापडली नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. (Sanchita Ugale Death)
’10 दिवसांपूर्वीच भेट झाली होती’ (Sanchita Ugale Death)
मेघा शर्मा यांनी सांगितले की, “संचिताच्या निधनाची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला. जानेवारीपासून ती नैराश्याच्या समस्येशी झुंज देत होती. तिच्या आयुष्यात काही वैयक्तिक अडचणी होत्या आणि त्यासाठी ती उपचारही घेत होती.”
त्या पुढे म्हणाल्या, “सुमारे दहा दिवसांपूर्वी मी तिला एका ऑडिशनसाठी घेऊन गेले होते. ऑडिशन झाल्यानंतर तिला हा रोल मिळेल, असा विश्वास तिच्या मनात होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिचा फोन बंद येत होता.”
मेघा शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्या आणि संचिताच्या कुटुंबीयांनी तिला सातत्याने सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस तपास सुरू (Sanchita Ugale Death)
संचिता उगले यांच्या मृत्यूबाबत पोलीस अधिक तपास करत असून, सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अभिनय कारकिर्द
:format(jpeg)/img/2026/06/sanchitadeathmain-1781510324.jpg)
Sanchita Ugale Death : ‘ती काही महिन्यांपासून नैराश्यात होती’; संचिता उगलेच्या मैत्रिणीचा मोठा दावा
संचिता उगले यांनी अनेक लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. याशिवाय ‘वागळे की दुनिया’ मालिकेतही त्यांनी काम केले होते. तसेच अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटात त्यांनी ताराराणी यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे मनोरंजनविश्व आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाबाबतच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sanchita Ugale Death)





