Actress Richa Chadda : अभिनेत्री रिचा चड्डाला मुलीची वाटते काळजी; मुलाखतीत म्हणाली “सध्याच्या जगात कसं वातावरण आहे, आणि…”

Actress Richa Chadda : बॅालिवूडमधील अभिनेत्री रिचा चड्डा हिचा चाहतावर्ग मोठा आहे. ती नेहमी तिच्या आयुष्यातील काही गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. दरम्यान रिचाची मुलगी एका वर्षांची झाली असून, अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्याविषयी काळजी व्यक्त केली आहे.
रिचाने मुलाखतीत प्रेग्नंसी, लेकीबद्दलची काळजी, आणि डिप्रेशन याचा अनुभव सांगितला आहे. जेव्हा तुम्हाला स्वत:ची सवय जास्त असते आणि तुमच्यावर एका छोट्या जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी पडते. ते खूप अवघड असतं. बाळाचे सुरुवातीचे सहा महिने खाण्यापिण्याची व्यवस्था सगळं काही कठिण असतं.
त्यामुळे जेव्हा मला मुलं होणार आहे कळलं होतं, त्यावेळी मला प्रचंड भिती वाटली होती. मी खूप घाबरले होते. माझ्या मनात त्यावेळी एकच विचार आला. सध्याच्या जगात कसं वातावरण आहे. आणि अशातच मुलं जन्माला घालणं खरंच योग्य आहे का? असा प्रश्न तिला पडला होता, असे रिचाने मुलाखतीत सांगितले.
अभिनेत्री रिचा चड्डा हि तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखली जाते. तिने अभिनेता अली फेजलसोबत लग्न केले आहे. दरम्यान, गेल्यावर्षी रिचा चड्डाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. लेकीच्या जन्मानंतर आता ती मातृत्व एन्जॉय करताना दिसत आहे. तिची लेक जुनैरा आता एका वर्षाची झाली आहे.





