‘द ब्लफ’च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रा थोडक्यात बचावली

अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत सेटवर अपघात झाला आहे. ती ऑस्ट्रेलियात ‘द ब्लफ’ या आगामी हॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग करत होती. यावेळी प्रियंकाच्या मानेवर खोलवर जखम झाली.
सुदैवाने ती मृत्यूपासून थोडक्यात बचावली. प्रियांकाने या जखमेचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला, हा फोटो पाहून चाहते हैराण आणि नाराज झाले आहे. प्रियांका चोप्राने याआधीही अनेकदा शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीच्या खुणा दाखवल्या आहे, पण यावेळी तिच्या मानेवर खूप खोल कट बसला आहे. या फोटोवर चाहते चिंता व्यक्त करत आहे.
प्रियांका ऑस्ट्रेलियात ‘द ब्लफ’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. या चित्रपटात ती कार्ल अर्बनसोबत काम करत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रँक ई फ्लॉवर्स यांनी केले आहे.
प्रियांकाच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, या चित्रपटाशिवाय प्रियांकाकडे जॉन सीनासोबत ‘हेड ऑफ स्टेट’ हा चित्रपट आहे. याशिवाय तिच्याकडे ‘सिटाडेल 2’ देखील आहे. चाहतेही प्रियंकाच्या बॉलिवूड चित्रपटाची वाट पाहत आहेत. ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ मध्ये दिसणार होती, ज्यात कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील आहेत, परंतु हा चित्रपट सध्या बॅक बर्नरवर आहे.






