अभिनेत्री प्रिया मराठे नव्या मालिकेत झळकणार खलनायिकेच्या भूमिकेत

Priya Marathe | अभिनेत्री प्रिया मराठेने हिंदीसह मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. यातच आता प्रिया मराठे नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. प्रिया मराठे या नव्या मालिकेत खलनायकी भूमिका साकारत आहे. ‘रागिणी अग्निहोत्री’ असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
प्राध्यापिका असणारी रागिणी अभिमन्यू राजेशिर्केच्या प्रेमात पडते. या मालिकेत अभिमन्यूला मिळवण्यासाठी हवे ते करायला तयार असणारी रागिणी कशाप्रकारे षडयंत्र रचते? ते मालिकेत पहाता येणार आहे. यात सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांच्या भूमिका आहेत. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने सुबोध भावे हा 20 ते 25 वर्ष लहान असलेल्या महाविद्यालयीन तरुणाची भूमिका साकारणार आहे.
दरम्यान, ही मालिका येत्या 8 जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. या मालिकेतील भूमिकेविषयी प्रिया देखील खूप उत्सुक आहे. अलीकडेच ती ‘तुझेच मी गीत आहे’ या मालिकेतही खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. मात्र तिने वर्षभरापूर्वी काही वैयक्तिक कारणाने या मालिकेचा निरोप घेतला. आता लवकरच प्रिया ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:





