अभिनेत्री पूजा सावंतचा नवा चित्रपट; ‘या’ अभिनेत्यासोबत करणार काम

Pooja Sawant | अभिनेत्री पूजा सावंतचा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘कप बशी’ या चित्रपटात पूजासह ऋषी मनोहर पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच ही जोडी एकत्र झळकणार आहे. सध्या मुंबईमध्ये या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू आहे.
‘कप बशी’ या चित्रपटाची निर्मिती कल्पक सदानंद जोशी करणार आहेत. त्यांचं चित्रपटसृष्टीशी जुने नाते असून त्यांचे वडील सदानंद जोशी यांनी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुत्रवती’ या चित्रपटासाठी कथा, पटकथा, गीतलेखन आणि निर्मिती अशा सर्वच बाजूंवर काम केलं होतं. या चित्रपटाला राष्ट्रीय, राज्यस्तरीय 14 पुरस्कारांनी गौरवला गेला होता.
View this post on Instagram
तर कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाइन, पुढचं पाऊल अशा गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर या चित्रपटातून नवीन कथा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे उत्तम अभिनय, मनोरंजनाचा आनंद या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. मात्र अद्याप या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Pooja Sawant |
पूजा सावंतने अनेक मराठी, हिंदी चित्रपटांत उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर ऋषि मनोहरनं टीव्ही मालिका, नाटक, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचला आहे. पूजा सावंत आणि ऋषी मनोहर यांची जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.Pooja Sawant |
हेही वाचा:





