Yuvraj Singh Video : युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं सर्वांच लक्ष, VIDEO होतोय व्हायरल
Yuvraj Singh Video : केरळमधील एका कार्यक्रमातील अभिनेत्री नव्या नायर आणि क्रिकेटपटू युवराज सिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yuvraj Singh video viral with Actress Navya Nair : मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील दोन मोठे दिग्गज जेव्हा एकाच व्यासपीठावर येतात, तेव्हा तो क्षण चाहत्यांसाठी पर्वणीच ठरतो. नुकताच केरळमध्ये असाच एक खास सोहळा पार पडला, जिथे भारतीय क्रिकेटचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नव्या नायर ( Navya Nair ) एकत्र दिसले. मात्र, या कार्यक्रमात अभिनेत्री नव्या नायरने केलेल्या एका कृतीने उपस्थितांसह नेटकऱ्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे.
विनम्रतेने जिंकली मने – (Yuvraj Singh Video)
केरळमधील एका प्रतिष्ठित ब्रँडच्या कार्यक्रमासाठी युवराज सिंग निमंत्रित होता. यावेळी नव्या नायरने जेव्हा युवराजचे स्वागत केले, तेव्हा तिने अत्यंत विनम्रतेने त्याला वाकून नमस्कार केला. एक मोठी स्टार असूनही तिने दाखवलेला हा आदर पाहून युवराज सिंगही भारावून गेला. या दोघांचे स्वागत होत असताना फटाके फोडण्यात आले. यावेळळी फोडलेल्या फटाकेचे कागद युवराजच्या खांद्यावर पडल्याचे लक्षात येताच नव्या नायरने स्वत:च्या हाताने हळूवारपणे काढले. तिची ही साधी पण प्रभावी कृती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
युवराजने बॅटवर दिला ऑटोग्राफ – (Yuvraj Singh Video)
Yuvraj Singh with Navya Nair at an event🫣
Hope Hazel Keech doesn’t watch this video, warna Yuvi paa ki fielding set hai 😭😂 pic.twitter.com/f0ZcWLZiTx
— Rohan💫 (@rohann__45) May 9, 2026
केवळ आदरच नाही, तर नव्या नायरने यावेळी युवराजशी मनमोकळा संवाद साधला. तिने आपल्या चाहत्यांसाठी आणि स्वतःसाठी काही क्रिकेट बॅट्सवर युवराजचा ऑटोग्राफदेखील घेतला. युवराजनेही तितक्याच आपुलकीने नव्या नायरच्या आदराचा स्वीकार केला आणि उपस्थितांना अभिवादन केले. दक्षिण भारतात पाहुण्यांचा सन्मान करण्याची जी परंपरा आहे, त्याचे उत्तम दर्शन नव्या नायरने घडवल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव – (Yuvraj Singh Video )
या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी नव्या नायरच्या संस्कारांचे कौतुक केले आहे. “प्रतिभा आणि विनम्रता यांचा हा सुंदर संगम आहे,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. युवराज सिंगच्या उपस्थितीमुळे आधीच उत्साहाचे वातावरण असलेल्या या सोहळ्यात नव्या नायरच्या या कृतीने अधिकच रंगत भरली.





