अभिनेत्री मौनी रॉयची नवी सुरुवात; मुंबईत सुरु केलं नवं हॉटेल

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर ती तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंकडे अनेकांचे लक्ष वेधले जाते. मौनीने सिनेसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाने मौनीने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनय क्षेत्रातील या यशानंतर आता तिने उद्योग क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे.
मुंबईमध्ये मौनी रॉय हिच्या मालकीच्या रेस्टॉरंटचे ओपनिंग झाले आहे. मुंबईच्या अंधेरी भागामध्ये मौनी रॉय हिने ‘बदमाश’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. ज्याचे ओपनिंग नुकतंच झाले आहे. मौनी रॉय हिने आपल्या रेस्टॉरंटच्या ओपनिंगचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये मौनी रॉय ही पती सूरज नांबियारसोबत दिसत आहे. तसेच, यावेळी रेस्टॉरंटच्या ओपनिंगला अनेक बॉलिवूड स्टारने हजेरी लावली असल्याचं दिसून आलं. मौनीच्या रेस्टॉरंटच्या लाँच पार्टीला दिशा पटानीपासून तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, अंकिता लोखंडे, विकी जैन आणि रेमो डिसूझा या स्टार्सनी हजेरी लावली होती.
View this post on Instagram
दरम्यान, मौनी रॉय शेवटची अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र पार्ट वन’ या चित्रपटात दिसली होती. ती लवकरच ‘द व्हर्जिन ट्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. सिद्धांत कुमार सचदेव दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त, सनी सिंग आणि पलक तिवारी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.





