अभिनेत्री मल्लिका शेरावतने ब्रेकअपबाबत केला स्वत: खुलासा

Mallika Sherawat Breakup | बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र बराच काळ सिनेसृष्टीपासून दुर राहिल्यानंतर तिने पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीत कमबॅक केले आहे. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. परदेशात राहत असताना ती एका मुलाला डेट करत होती. मात्र आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. याबाबत तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
ती म्हणाली की, “हो माझे ब्रेकअप झाले आहे. खूप काळापासून मी सिरिल ऑक्सेनफेंसला डेट करत होते. मात्र आता आमचा ब्रेकअप झाला आहे. आम्ही वेगळे झालो आहोत. आताच्या काळात चांगला जोडीदार शोधणे खूपच कठीण आहे. मला याबद्दल जास्त काही बोलायचे नाही. पण आता मी सिंगल आहे. इतकी वर्षे झाली, मी अजूनही वाट पाहत आहे. कदाचित मी खूप अपेक्षा करत आहे. ” लग्नसंस्थेबाबत मल्लिका म्हणाली, “मी लग्नसंस्थेचा विचारच करत नाही. हा फक्त त्या दोन लोकांचा निर्णय आहे. त्यामुळे तो फक्त त्यांनीच घ्यावा.” Mallika Sherawat Breakup |
View this post on Instagram
मल्लिका शेरावतचा सिरिल ऑक्सेनफेन्स हा बॉयफ्रेंड होता. हा फ्रान्सचा नागरिक असून बिझनेस मॅन आहे. मल्लिका आणि तो पॅरिसमध्ये राहायचा. रिअल इस्टेटमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक आहे. दरम्यान, अलिकडेच मल्लिका ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटात पाहायला मिळाली. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांनी यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यास यशस्वी ठरू शकला नाही. Mallika Sherawat Breakup |
हेही वाचा :
चिन्मय प्रभूच्या अटकेने बांगलादेशात खळबळ ; हिंदू विरोधामुळे संतप्त झालेल्या जमातकडून हल्ला





