अभिनेत्री मलायका अरोरा स्पेनमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय

Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. दरम्यानच्या काळात अनेकदा अर्जुन कपूर आणि मलायकाच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. यातच आता मलायका अरोरा स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी देखील मलायका अनेक ठिकाणी व्हेकेशनसाठी गेल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र यावेळी ती अर्जुनसोबत नाही तर एकटी स्पेनमध्ये व्हॅकेशनला गेली आहे.
दरम्यान,अंबानींच्या लग्नामध्ये नुकताच अर्जुन कपूर हा बहिणीसोबत पोहोचला होता. दुसरीकडे मलायका अरोरा ही विदेशात धमाल करताना दिसत आहे. अनेकदा पार्टीत मलायका आणि अर्जुन कपूर हे एकत्र दिसतात. मात्र, यावेळी अर्जुन कपूर हा बहिणीसोबत अनंत अंबानीच्या लग्नाला पोहोचला. तर मलायका अरोरा ही स्पेनमध्ये सुट्टी घालवताना दिसत आहे.
त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. मलायकाने स्पेनमधील काही खास फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मलायका अरोरा ही हॉट आणि बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिने ग्रीन रंगाचा टू पीस घातल्याचे बघायला मिळत आहे. हा फोटो शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘डेझर्ट सर्व्ह केले आहे.’ सध्या तिच्या या फोटोला चाहत्यांची देखील चांगलीच पसंती मिळत आहे. Malaika Arora |





