अभिनेत्री क्रिती सेनॉनने बॉयफ्रेंडसोबतचे शेअर केले फोटो; सोबत लोकप्रिय अभिनेताही उपस्थित

Kriti Sanon With Boyfriend Kabir Bahia | अभिनेत्री क्रिती सेनॉन तिच्या चित्रपटामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मागील काही दिवसांपासून तिचे नाव कबीर बाहियाशी जोडले जात आहे. आता पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला आहे. त्याचे कारण म्हणजे क्रितीने सोशल मिडियावर कबीरसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
क्रिती आणि कबीर बाहियाअबू धाबी येथील एतिहाद अरेना येथे आयोजित करण्यात आलेल्या UFC 321 या फाईट नाईटसाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे, यावेळी त्यांच्यासोबत अभिनेता वरुण धवन देखील होता.
क्रिती आणि कबीर यांच्या डेटिंगच्या अफवा तेव्हापासून सुरू झाल्या, जेव्हा क्रितीने ग्रीसमध्ये कबीरसोबत तिचा ३४ वा वाढदिवस साजरा केला होता. ते दोघे एकत्र वेळ घालवत असतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तेव्हा व्हायरल झाले होते. त्यानंतर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दोघांना एकत्र पाहिले गेले आहे.
काही दिवसांपूर्वी क्रिती आणि कबीरने एकत्र दिवाळी साजरी केली होती. यावेळी तिचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
View this post on Instagram
कोण आहे कबीर बहिया?
कबीर बहिया हा एक ब्रिटीश व्यापारी आहे. यूके स्थित ट्रॅव्हल एजन्सी साउथॉल ट्रॅव्हलचे मालक कुलजिंदर बहिया यांचा तो मुलगा आहे. तो वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टुरिझम लिमिटेडचे संस्थापक देखील आहे. कबीर हा भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीचा मेहुणा आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले तर, क्रिती सध्या दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी ‘तेरे इश्क में’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात क्रितीसोबत अभिनेता धनुष मुख्य भूमिकेत आहे. हा रोमँटिक चित्रपट येत्या २८ नोव्हेंबर रोजी जगभरात हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
raveena tandon: अजय देवगणला लव्ह लेटर्स लिहायची रवीना टंडन? ‘सिंघम’ म्हणाले… ती तर जन्मजात खोटारडी!





