Kriti Sanon : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॅान सध्या ‘कॉकटेल 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार असल्याने ती खूप उत्सुक आहे. कॅाकटेल 2 हा चित्रपट 2012 साली आलेल्या कॅाकटेल चित्रपटाचा रिमेक असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच क्रितीने एका मुलाखतीत कॅाकटेल 2 मध्ये तिला कसं कास्ट करण्यात आले याविषयी सांगितले. ‘कॉकटेल 2’ हा चित्रपट 19 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर समोर आले होते. आता ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मुलाखतीत क्रितीने ‘कॉकटेल 2′ चे दिग्दर्शक होमी अदजानिया यांचे कौतुक केले. ती म्हणाली, “होमी यांची कलात्मक जाण उत्तम आहे आणि ते स्वभावाने खूप कूल आहेत. त्यांनी माझ्यातील एक अशी कूल बाजू समोर आणली, जी माझ्यात आहे हे मला स्वतःलाही माहीत नव्हते.” कॉकटेल 2’ ची ऑफर का स्विकारली, हे देखील बोलताना तिने स्पष्ट केले. ती म्हणाली की, तिचा आधीचा चित्रपट ‘तेरे इश्क में’, खूप भावनिक होता. त्यामुळे तिला काहीतरी हलकंफुलकं आणि मजेशीर हवं होतं. जेव्हा ‘कॉकटेल 2’ ची ऑफर आली, तेव्हा तिने लगेच होकार दिला. ती म्हणाली, “मला नेमकं इथेच राहायचं आहे.” तसेच क्रितीने पुढे सांगितले की तिला वेगवेगळ्या भूमिका साकारायला खूप आवडतात. ‘कॉकटेल 2’ चित्रपटात शाहिद कपूर, क्रिती सेनॅान आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. होमी अदजानिया यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ही एक आधुनिक काळातील प्रेमकथा आहे, जी मैत्री आणि नात्यांमधील गुंतागुंत सांगणार आहे. क्रिती सेनॅान ही बॅालिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. आजवर तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत. ती सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय असते. तिने हिरोपंती या चित्रपटातून बॅालिवूडमध्ये एन्ट्री केली. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्रा टायगर श्रॅाफ होता. हेही वाचा : Balen Shah plan: “विद्यार्थी राजकारणावर बंदी, पाचवीपर्यंत परीक्षा नाहीत, परदेशी नावांवर कडक निर्बंध…”; बालेन शाह यांच्याकडून नेपाळच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तन