अभिनेत्री ‘क्रिती सेनन’ प्रभूश्रीरामाच्या भक्तीत तल्लीन; नाशिकच्या काळाराम मंदिराला दिली भेट !

नाशिक – साऊथ स्टार प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकही खुश झाले आहेत म्हणूनच सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये ‘सीता’ ची भूमिका साकारणारी बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन हिने नाशिक नगरीतील प्रसिद्ध काळाराम मंदिर व सीता गुहेत जाऊन सीता देवीचे दर्शन घेतले आहे. तसेच ‘राम सिया राम’ या नवीन गाण्यावर आरती देखील केली आहे. तसेच ‘राम सिया राम’ गाण्याचे गायक साचेत-परंपरा हे देखील क्रिती सोबत दिसत आहे. या प्रसंगाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, ‘आदिपुरुष’ सिनेमातील ‘जय श्री राम’ या पहिल्या गाण्याच्या पाठोपाठ ‘राम सिया राम’ हे दुसरे नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून हे गाणे साचेत-परंपरा या जोडीने गायले आहे. सध्या सगळीकडे याच गाण्याची चर्चा रंगताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांचा या गाण्याला मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.





