अभिनेत्री कीर्ती सुरेशने पतीसोबत मालदीव ट्रीपचा लुटला आनंद; दोघांचे सुंदर फोटो केले शेअर; चाहते कमेंट्स करत म्हणाले….

Actress Keerthy Suresh : दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने तिच्या सोशल मीडिया हँन्डलवरून मालदीव व्हेकेशन ट्रीपचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचा पती अँटनी थॅटिलशी दिसत आहे. दोघेही मालदीप ट्रेपवरून असून, व्हेकेशनचा आनंद घेताना दिसत आहेत. या फोटोंसोबत कीर्तीने एक खास कॅप्शन दिले आहे. हे कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘मानसिकदृष्ट्या #मालदीवमध्ये, शारीरिकदृष्ट्या इथे मेकअपच्या स्वरूपात.’..।’ असे या फोटोंखाली कॅप्शन तिने दिले आहे. दोघांच्या सुंदर फोटोंना तिच्या चाहत्यांनी लाईक करत कमेंट्स केल्या आहेत. कीर्तीच्या या फोटोंवर दक्षिणात्य अभिनेत्री श्रेया सरनने लिहिले, ‘नमस्कार सुंदर’. कीर्तीच्या या फोटोंवर अनेक वापरकर्त्यांनी अद्भुत कमेंट्सही केल्या असल्याची कमेंट तिने केली आहे. त्याचवेळी, अनेक चाहत्यांनी या फोटोंवर लाल रंगाचे हार्ट इमोजी आणि फायर इमोजी कमेंट केले आहेत.
View this post on Instagram
कीर्ती सुरेशने १२ डिसेंबर २०२४ रोजी गोव्यात तिचा जुना प्रियकर अँटनी थॅटिलशी लग्न केले. त्यांनी पारंपारिक हिंदू आणि मल्याळी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. या लग्नाला साऊथ इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता विजय हा देखील लग्नाला आवर्जून उपस्थित होता.
कीर्तीने अनेक उत्तम दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. रिंग मास्टर, नेनू सैलजा, रजनीमुरुगन आणि रेमो सारख्या या चित्रटातील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कीर्तीने बेबी जॉन या चित्रपटात अभिनेता वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटात कीर्ती व्यतिरिक्त वरुण धवन, वामिका गब्बी, झारा ज्ञाना आणि जॅकी श्रॉफ यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. कीर्तीचा इन्स्टावर मोठे चाहतावर्ग आहे.
हेही वाचा: Ajit Pawar : लाडकी बहीण योजना बंद होणार का? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं…





