Karishma Tanna pregnancy : टेलिव्हिजन अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; वयाच्या ४२ व्या वर्षी होणार आई
Karishma Tanna pregnancy : करिश्मा तन्नाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती आई होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

Karishma Tanna pregnancy : अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna ) बिग बॉस ८’ ची रनर-अप राहिली आहे. टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी लिटी शोच्या माध्यमातून तिने घराघरांत लोकप्रियता मिळवली आहे.
टेलिव्हिजन, बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिने उत्तम काम केले आहे. मात्र करिश्मा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुडन्यूज दिली आहे. करिश्मा तन्नाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ती आई होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
करिश्मा तन्नाने तिच्या इन्स्टाग्रामवर मॅटर्निटी फोटो पोस्ट करत लिहिले की, “एक छोटासा चमत्कार, आमचं सर्वात मोठं गिफ्ट ऑगस्ट २०२६ मध्ये येणार आहे.” फोटोंमध्ये करिश्मा बेबी बंप फ्लाँट करते. करिश्मा तन्नाने ही आनंदाची बातमी दिल्यानंतर सर्वांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
करिश्मा तन्ना व वरुण बंगेराचे लग्न Karishma Tanna pregnancy
करिश्मा तन्ना व वरुण यांनी ५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईत एका खासगी समारंभात लग्न केलं. वरुण हा चित्रपटसृष्टीतील नसून तो एक यशस्वी व्यावसायिक आहे. तो ‘VB Corp’ या रिअल इस्टेट कंपनीत डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे.
दरम्यान, पती वरुण बंगेराशी लग्नानंतर ४ वर्षांनी करिश्मा ही आनंदाची बातमी दिली असून वयाच्या ४२ व्या वर्षी ती आई होणार आहे. Karishma Tanna pregnancy
View this post on Instagram
दरम्यान, करिश्मा तन्नाने एकता कपूरच्या प्रसिद्ध ‘क्युंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘कही तो मिलेंगे’, ‘बालवीर’, आणि ‘नागिन ३’ सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.
करिश्मा ‘बिग बॉस ८’ ची रनर-अप असल्याशिवाय, तिने ‘झलक दिखला जा ९’, ‘नच बलिये ७’ मध्ये सहभाग घेतला होता. ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी १०’ची ती विजेती ठरली होती. तिने ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘संजू’ सिनेमात काम केलंय. तसेच २०२३ मध्ये ‘स्कूप’ या नेटफ्लिक्स सीरिजमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. Karishma Tanna pregnancy
हेही वाचा:





