बॉलीवूडच्या दिखाऊपणाचा अभिनेत्री कल्कीने केली पोलखोल

Kalki Koechlin | अभिनेत्री कल्कि कोचलिन अनेकदा परखड मत व्यक्त करताना दिसते. अलिकडेच कल्किने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील कलारांना गरज नसताना दिखाऊपणा करावा लागतो. सेलिब्रिटींना एक इमेज बनवण्यासाठी स्वत: वर गरज नसताना जास्त खर्च करावा लागतो असे सांगितले आहे. यावेळी तिने एका अवॉर्ड फंक्शनमध्ये छोट्या गाडीत आल्याने थांबवण्यात आल्याचा अनुभव देखील शेअर केला आहे.
कल्किनं एका या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘बऱ्याच वर्षांपूर्वी मी माझ्या स्विफ्टमध्ये अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली होती आणि माझा ड्रेस हा कारपेक्षा मोठा होता. ते माझ्या गाडीला व्हेन्यूच्या आत जाऊच देत नव्हते. मग मला प्रत्येकवेळी माझं इनव्हिटेशन दाखवावं लागलं आणि त्यांना सांगावं लागत होतं की मी कोण आहे.’
पुढे कल्किनं सांगितलं की ‘असे अनुभव असले तरी मला माझे आयुष्य हवं तसं जगण्यापासून थांबवू शकत नाही. मी अशीच आहे आणि मला स्वातंत्र्य हवं आहे. याचा अर्थ असं नाही की मला माझ्या आयुष्यात रिलॅक्स करायचं आहे आणि माझ्या पद्धतीनं काम करायचं आहे.
कल्किला ‘कलाकारांनी त्यांची इमेज तयार करणं गरजेचं असतं का?’ असा सवालही करण्यात आला होता. त्यावर कल्कि म्हणाली, “हे काही प्रमाणात गरजेचं असतं. जर तुम्ही एक मोठे कलाकार आहात. तर सुरक्षा एक मोठा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठे कलाकारांच्या बाबतीत आहे. त्यासाठी मी काही लोकांनी बॉडीगार्ड आणि पीआर ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
पण मी अशा लोकांना ओळखते जे एका छोट्या 1BHK मध्ये राहतात, पण त्यांच्याकडे ऑडी आहे. ते ड्रायव्हरसोबत ऑडीमध्ये मीटिंगसाठी जातात पण ते स्वत: एका छोट्या घरात राहतात. माझ्यायासाठी स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. मी गोवा आणि मुंबईतील घरांमध्ये ये-जा करण्यासाठी पैसे खर्च करते, माझे सर्व पैसे तिथेच खर्च होतात,” असेही कल्किने सांगितले.
हेही वाचा:
Pune : बिबवेवाडीत अल्पवयीन मुलांकडून वाहनांची तोडफोड; ९ जण ताब्यात





