अभिनेत्री ‘जायरा वसीम’ची हिजाबच्या वादामध्ये उडी; वाचा ‘ती’ भली मोठी पोस्ट….

नवी दिल्ली – देशात सध्या हिजाब प्रकरणावरून मोठा राडा सुरु असल्याचे दिसत आहे. कारण कर्नाटकच्या कॉलेजमधील एका व्हिडीओने देशात नवीन वादळ निर्माण केले आहे. या व्हिडीओत एक तरुणी हिजाब घालून कॉलेजमध्ये आली असता एक जमाव तिच्या दिशेने चालत येतो. यानंतर तो जमाव तरुणीसमोर ‘जय श्रीराम…’च्या घोषणा देण्यास सुरुवात करतात. यानंतर तरुणीदेखील त्यांना तेवढ्याच धाडसाने उत्तर देत ‘अल्लाहू अकबर…’ ची घोषणा दिली. असं सर्व काही या व्हिडिओत दिसून आलं.
दरम्यान, आता हिजाब प्रकरणावर दंगल गर्ल अभिनेत्री ‘जायरा वसीम’ने उडी घेतली असून, आपलं मत व्यक्त केलं आहे. या घटने संदर्भातील एक भली मोठी पोस्ट जायराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. हिजाबवर बंदी हा अन्याय असल्याचे तिने नमूद केले. तसेच धार्मिक बांधिलकीसाठी महिलांचा छळ होत असलेल्या संपूर्ण व्यवस्थेचा तिने विरोध केला.
काय आहे? अभिनेत्री ‘जायरा वसीम’ची ती भली मोठी पोस्ट…..
“वारशात मिळालेला हिजाब ही निवड नाही. ही एक प्रकारची कल्पना आहे जी सोयीनुसार तयार केली गेलीय. इस्लाममध्ये हिजाब हा पर्याय नसून एक बंधन आहे. हिजाब परिधान करणारी एक स्त्री देवाने दिलेलं एक कर्तव्य पूर्ण करत आहे. ज्या देवावर ती प्रेम करते आणि ज्याच्यासमोर ती स्वतःला सादर करते.
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) February 19, 2022
मी देखील हिजाब सन्मानाने आणि आदराने परिधान करतो. मी या व्यवस्थेला विरोध करते जिथे महिलांना धर्माच्या नावाखाली हे करण्यापासून रोखले जात आहे. मुस्लिम महिलांसोबत भेदभाव करणे, त्यांना शिक्षण आणि हिजाब यापैकी एक निवडायला लावणे आणि एक सोडायला लावणे हे अन्यायकारक आहे.” असं तिने लिहलं आहे.





