वाढत्या वजनामुळे अभिनेत्री इलियाना डिक्रुझ त्रस्त? म्हणाली, ‘जेव्हा आई होणार…’

मुंबई – अभिनेत्री इलियाना डिक्रुझ लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. इलियाना लग्नाआधी अभिनेत्री आई होत असल्याने तिला प्रचंड ट्रोलही केले जात आहे.विशेष म्हणजे अभिनेत्रीने बाळाच्या होणाऱ्या वडिलांची फोटोद्वारे झलक सोशल मीडियावर शेअर केली होती.
या पार्श्वभूमीवर चाहत्यांसोबत शुक्रवारी एनिथींग सेशनच्या माध्यमातून संवाद साधताना इलियानाला प्रेग्नेंसी दरम्यान वाढणाऱ्या वजनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘सुरुवातीच्या दिवसांत काळजी वाटत होती. पण आता मला याचा काहीही फरक पडत नाही. कधी-कधी अस्वस्थ वाटते. पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती कायम तुम्हाला सांगत राहतात की, तुमच्यात एक जीव घडत आहे.’
‘जेव्हा तुम्ही आई होणार असता, तेव्हा तुमच्या वाढत्या वजनावर लोक टिपणी करत असतात. तुम्ही डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाता, तेव्हा डॉक्टर देखील मदत करु शकत नाही. वाढत्या वजनाबद्दल सतत डोक्यात विचार येत असतात…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
पुढे बोलताना इलियाना म्हणाली की, ‘मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, गेल्या काही महिन्यात माझ्या शरीरात अनेक बदल झाले आहेत आणि झालेले बदल मला आवडत आहेत. एक उत्तम प्रवास मी सध्या करत आहे. अशात माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमुळे मला आनंद मिळतो. त्यामुळे वाढत्या वजनाचा मला काही फरक पडत नाही.





