कार्तिक आर्यनच्या चित्रपटात अभिनेत्री हेमांगी कवी दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

Kartik Arayan And Hemangi kavi| अभिनेता कार्तिक आर्यन ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. नुकतेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील त्याच्या लुकचे अनेकांनी कौतुक केले. विशेष म्हणजे या सिनेमात एका मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी लवकरच ‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमात दिसणार आहे. हेमांगीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती या सिनेमाचा भाग असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ‘चंदू चॅम्पियन’ या सिनेमात हेमांगीने मुरलीकांत पेटकर यांच्या आईची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा देखील याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. Kartik Arayan And Hemangi kavi|
View this post on Instagram
दरम्यान, या सिनेमातून भारताचे पहिले पॅराऑलम्पिक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. मुरलीकांत पेटकर हे सैन्यात भरती झाले होते. मात्र, भारत-पाक युद्धात त्यांना गोळ्या लागतात आणि त्यांना कायमचं अपंगत्व येतं. मात्र, अपंगत्वावर मात करत ते पुन्हा नव्याने उभे राहतात आणि पॅराऑलम्पिक स्पर्धेत चक्क सुवर्ण पदक पटकावतात. साजिद नाडियादवाला कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 14 जून रोजी हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे. Kartik Arayan And Hemangi kavi|
हेही वाचा:
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले,’योगीजी, तुमचा खरा शत्रू भाजपमध्येच…’





