अभिनेत्री गौहर पतीपेक्षा १२ वर्षांनी मोठी; ट्रोल करणाऱ्यांना सुनावले, म्हणाली ‘फरक पडत नाही’

Gauhar Khan | अभिनेत्री गौहर खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने जैद दरबारसोबत विवाह केला. मात्र ती पतीपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. वयाच्या फरकामुळे तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. मात्र आता तिने एका पॉडकास्टदरम्यान, ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे
अलीकडेच गौहर, अभिनेत्री देबिना बॅनर्जीच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने सांगितले की, “माझ्या आणि जैदबद्दल पहिल्या बातम्या मीडियातून आल्या. आम्ही काहीच पब्लिकली सांगितलं नव्हतं, पण तरीही हेडलाइन आली की मी 12 वर्षांनी लहान मुलासोबत लग्न केलं. ही माहिती कुठून आणतात हेच समजत नाही. ” Gauhar Khan |
गौहर पुढे म्हणाली, “मला आणि जैदलाच काही वाटत नाही तर जग काहीही बोलेल काय फरक पडतो. आपल्या इंडस्ट्रीमध्ये बरेच कपल्स आहेत ज्यांच्यामध्ये आहे आणि ते अगदी नॉर्मल आहे. पण अडचण ही आहे की लोक काहीही विचार न करता बोलतात. मी कधीही यावर स्टेटमेंट दिलं नाही. मग तो फरक 2 वर्षांचा असो किंवा 12 वर्षांचा. जेव्हा आम्हाला काही फरक पडत नाही, तर इतरांनी का बोलावं?” Gauhar Khan |
गौहरनं असंही सांगितलं की, “लग्नाचं आम्ही ठरवलं होतं की सर्वांना सांगायचं आणि आशीर्वाद घ्यायचा, पण कोणाच्या मताला फारसं महत्त्व द्यायचं नाही. जैदनं मला आपल्या घरच्यांना भेटवलं, आणि मीही त्याला माझ्या कुटुंबाशी ओळख करून दिली. आम्ही फक्त एवढंच सांगितलं, आम्ही लग्न करतोय, ही तारीख आहे, यायचं असेल तर फक्त आशीर्वाद द्यायला या.” दोघांच्याही घरच्यांंनी त्यांना सपोर्ट केला होता, हे देखील तिने सांगितले.
दरम्यान, गौहर खानने २०२० साली जैद दरबारसोबत लग्न केलं. इन्स्टाग्रामवर त्यांची ओळख झाली होती. गौहर जैदहून १२ वर्षांनी मोठी आहे. जैद सध्या केवळ २९ वर्षांचा असून गौहर ४१ वर्षांची आहे.
हेही वाचा :





