फेक बेबी बंप म्हणणाऱ्या यूजर्सना अभिनेत्री दृष्टी धामीने दिले सडेतोड उत्तर

Drashti Dhami Pregnant| ‘मधुबाला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दृष्टी धामी आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियाद्वारे ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने 2015 साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या 9 वर्षानंतर दृष्टी आई होणार आहे.
अलीकडेच दृष्टी धामीने तिचे बेबी बंप फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले होते. मात्र काहींनी दृष्टीच्या बेबी बंपला फेक म्हटले. यावर आता दृष्टीने देखील यूजर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. दृष्टीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये मॅटर्निटी फोटोशूट केल्याचं दिसत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत तिने “माझं बेबी बंप हे फक्त जेवणामुळे वाढलेलं पोट नाही, याचा हा पुरावा…जे लोक मला विचारत होते…तुम्हाला दिसत आहे का आता?” असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचे समर्थन केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, 14 जून 2024 रोजी दृष्टी धामी आणि तिचा पती नीरज यांनी व्हिडिओ शेअर केला होता आणि चाहत्यांना सांगितले होते की लवकरच ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दृष्टी धामी आणि तिचा नवरा नीरज यांच्या हातात वाईनचा ग्लास असल्याचे दिसून येते, मात्र त्यानंतर तिचे कुटुंबीय त्यांच्या हातातून वाइन ग्लास घेतात आणि त्यांना दुधाची बाटली देतात. तिच्या पोस्टनंतर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता.
दृष्टी धामीने ‘मधुबाला’सह ,’दिल मिल गए’,’परदेस मे है मेरा दिल’ या सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती ‘दुरंगा’ आणि ‘द एम्पायर’ या वेबसिरीजमध्ये देखील झळकली होती.
हेही वाचा :





