अभिनेत्री दीपिका सिंहला शूटिंगदरम्यान दुखापत

Deepika Singh Injured| छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका सिंह नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते. अनेकदा ती डान्सचे व्हिडिओ शेअर करताना दिसते, मात्र यामुळे तिला ट्रोलही केले जाते. परंतु आता शूटींगदरम्यान दीपिकाला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दीपिका सिंह तिच्या ‘मंगल लक्ष्मी’ शोच्या शूटिंगदरम्यान पुन्हा एकदा जखमी झाली आहे.
दीपिका फिल्मसिटीमध्ये तिच्या डेली सोप ‘मंगल लक्ष्मी’साठी ड्रीम सिक्वेन्सचे शूटिंग करत होती. ती शूट करत असताना तिच्या मागे लावलेला एक मोठा आणि जड प्लायवूड बोर्ड वाऱ्यामुळे तिच्या पाठीवर पडला, त्यामुळे दीपिका जखमी झाली. विशेष म्हणजे तरीही दीपिकाने तिचे शूटिंग थांबवले नाही, पण तिच्या पाठीला जास्त सूज आल्यामुळे तिला शूट थांबवावे लागले. Deepika Singh Injured|
यापूर्वी शूटिंगदरम्यान त्याच्या डोळ्यात रक्ताची गुठळी तयार झाली होती. दुखापत होऊनही तिने शूटिंग सुरूच ठेवले होते. याबाबत सोशल मीडियावर तिने माहिती दिली होती. दरम्यान, ‘मंगल लक्ष्मी’ ही मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मंगल आणि लक्ष्मी या दोन बहिणींची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येत आहेत. ज्यात दीपिकाने मोठी बहीण मंगलची भूमिका केली आहे. Deepika Singh Injured|
दीपिका ‘दिया और बाती हम’ या शोमध्ये तो दिसला होता. या शोमध्ये ती संध्या राठीच्या भूमिकेत होती. दीपिका सिंहला या शोमुळे रातोरात प्रसिद्ध मिळाली.
हेही वाचा:
विषारी दारु प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू; 60 हून अधिक जणांवर उपचार सुरू





