अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनचे रुपेरी पडद्यावर कमबॅक; ‘या’ चित्रपटातून येणार भेटीला, ती खंत व्यक्त करत म्हणाली…

Actress Anupama Parameswaran : मल्ल्याळम इंडस्ट्रीतील अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन तिच्या आगामी ‘जानकी बनाम केरळ राज्य’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अनुपमा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागम करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच चित्रपटातील अॅाडिओ लॅान्च सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अनुपमाने तिला जाणूबुजून ट्रोल केले जात असल्याचे विधान केले आहे.
अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन ही अभिनेत्री दक्षिणेतील आत्ताच्या घडीच्या पहिल्या दहा अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये आहे. मल्याळी असूनही, अनुपमाने तेलुगू चित्रपटसृष्टीतही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता अनुपमा सुरेश गोपी यांच्या ‘जानकी बनाम केरळ राज्य’ ‘ या चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. चित्रपटाच्या ऑडिओ लाँन्च कार्यक्रमात तिने फिल्मी कारकीर्दीचे सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणांना उजाळा दिला.
“मला अभिनय कसा करायचा हे माहित नाही असे म्हणत अनेकांनी मला मल्याळम चित्रपटात काम करण्यास नकार दिला. मला त्याकाळात प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लोकांनी जाणूनबुजून माझ्यावर टीका केली आणि मला लक्ष्य केले, अशी खंत तिने बोलताना व्यक्त केली. ‘जानकी बनाम केरळ राज्य’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण नारायणन यांनी मला या चित्रपटासाठी कास्ट केले. मला ही भूमिका दिल्याबद्दल प्रवीण नारायणन यांचे आभार.
अभिनेता सुरेश गोपी यांनी देखील अनुपमा परमेश्वरन हिचे कौतुक केले. तसेच त्यांनी अनुपमाची तुलना सिमरन, नयनतारा आणि असिन सारख्या अभिनेत्रींशी केली. सुरेश गोपी म्हणाले की, सुरुवातीला या तिन्ही अभिनेत्रींना दुर्लक्षित केले गेले होते, परंतु नंतर त्या स्टार झाल्या. यामुळे अनुपमा देखील एक मोठी स्टार बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनुपमा परमेश्वरनने , पसिनेकारकीर्दीची सुरुवात ‘प्रेमम’ या कल्ट चित्रपटातून केली. त्यानंतर तिने ‘टिल्लू स्क्वेअर’, ‘ए एए’ आणि ‘कार्तिकेय २’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. ती शेवटची २०२१ मध्ये आलेल्या ‘कुरूप’ या चित्रपटात दिसली होती.
हेही वाचा: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 8 गाड्यांचा भयंकर अपघात; कैद्यांच्या वाहनाला जोरदार टक्कर, 12 पोलीस जखमी!




