अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रेग्नंट? ‘लाफ्टर शेफ्स’ सीजन 2 च्या प्रोमोत नेमकं काय म्हणाली? व्हिडीओ व्हायरल

Actress Ankita Lokhande : लाफ्टर शेफ्स या प्रसिद्ध शोच्या दुसऱ्या सीजनचा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोत अभिनेत्री अंकिता लोखंडेने प्रेग्नंट असल्याचे सांगितले आहे. यामुळे आता अंकिता लवकरच गूडन्यूज देणारी असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शोमधील प्रोमोत अंकिताने केलेल्या स्टेटमेंटचा भाग सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन देखील केले आहे. यामुळे अंकिता खरंच प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न केला जात असून नेमकं काय घडलं आहे हे समजून घेऊयात. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन या दोघांनीही २०२१ मध्ये लग्न लग्न केले. त्यानंतर दोघेही त्यांच्या पहिल्या बाळासाठी प्लॅन करत असल्याची चर्चा आहे. नुकताच ‘लाफ्टर शेफ्स’च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर सीझन २ चा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अंकिता तिच्या गरोदरपणाची घोषणा करताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये काय?
या प्रोमोध्ये दिसत आहे की, कृष्णा अभिषेकने अंकिता लोखंडेच्या हातातून मसाला हिसकावून घेतला. यानंतर, अंकिताने कृष्णाच्या मागे धावत जाऊन थांब मी प्रेग्नंट असल्याचे ती म्हणाली आहे. तिचे हे वाक्य ऐकूण सगळ्याच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावेळी कृष्णा आणि अभिषेक गंमतीने म्हणतात, ‘मुलगा होईल.’ हे ऐकून करण कुंद्राही अंकिता लोखंडेकडे येतो आणि विचारले, तू खरोखर प्रेग्नंट आहे ? यानंतर तिथे बसलेले प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आणि हे ऐकून हसले असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर हा प्रोमो रिलीज झाल्यानंतर अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अंकिताचे अभिनंदन केले, तर अनेकांना प्रश्न पडला की हा विनोद होता का? की खरचं अंकिता प्रेग्नंट आहे. एका युजरने लिहिले की, ‘जर हे खरे असेल तर ते खूप चांगले आहे पण जर हे विनोद असेल तर अशा गोष्टींबद्दल विनोद करू नये.’ मात्र, सोशस मीडियावर अंकिता प्रेग्नंट असल्याची चर्चा होत आहे.
हेही वाचा : मंत्री दादा भुसे राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी; हिंदी सक्तीसंदर्भात समजूत काढण्याचा प्रयत्न





