अभिनेत्री अॅमी जॅक्सन ब्रिटिश बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबंधनात

Amy Jackson Got Married | बॉलिवूड अभिनेत्री अॅमी जॅक्सनने अभिनेता एडवर्ड वेस्टविकशी लग्नगाठ बांधली आहे. इटलीमध्ये दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. नुकतेच या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो त्यांचा चाहत्यांच्या पसंतीस पडले असून ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अॅमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविक यांनी आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. दोघांनीही इटलीमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे. यावेळी अॅमी जॅक्सन पांढऱ्या गाऊनमध्ये दिसली, तर एडवर्ड काळ्या पँटसह पांढरा ब्लेझर घातला होता. दोघेही या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होते. Amy Jackson Got Married |
View this post on Instagram
अॅमी जॅक्सनने चाहत्यांना लग्नाची झलक दाखवत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नवा प्रवास नुकताच सुरू झाला आहे.’ पहिल्या छायाचित्रात अॅमी कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. तर दुसऱ्या चित्रात अॅमी आणि एडवर्ड दोघेही पोज देताना दिसत आहेत. एडवर्ड हा ब्रिटिश अभिनेता आणि संगीतकार आहे. अॅमी आणि एडवर्ड हे दोघेही २०२२ पासून एकत्र असल्याचे म्हटलं जातं. अॅमी आणि एडवर्डने जानेवारीमध्ये साखरपुडा केला. त्यानंतर आता ते विवाह बंधनात अडकले. Amy Jackson Got Married |
वास्तविक, अभिनेत्री याआधी बिझनेसमन जॉर्ज पानायियोटोसह रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र त्यांचा साखरपुडा तुटला. पण दोघांना 5 वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव अँड्रियास जॅक असे आहे. एमी जॅक्सन अखेरची विद्युत जामवालच्या ‘कमांडो’मध्ये दिसली होती. तिने ‘एक दीवाना था’ या चित्रपटातून प्रतीक बब्बरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय ती ‘सिंग इज ब्लिंग’ आणि ‘फ्रीकी अली’ सारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे.
हेही वाचा:
“….म्हणून त्यांचा एकच आमदार” : राज ठाकरेंच्या भूमिकेवरून रोहित पवारांचा टोला





