अमृता खानविलकरच्या सुंदर त्वचेचं रहस्य काय? अभिनेत्रीने शेअर केला खास स्किन केअर रुटीन व्हीडिओ

Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाद्वारे मराठी सिनेसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कामाबद्दल व जीवनशैलीबाबत चाहत्यांना नेहमीच माहिती देत असते. आता अमृताने तिच्या खास स्किन केअर रुटीनचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हीडिओच्या माध्यमातून अमृताने त्वचेची काळजी कशी घ्यावी, व्यायामानंतर चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी काय करायला हवे, याची माहिती चाहत्यांना दिली आहे. व्हिडिओ शेअर करत अमृताने लिहिले की, ‘वर्कआउटनंतर स्किन केअर रूटीन आवश्यक आहे. कारण, वर्कआउटमुळे आनंदी हार्मोन्स रिलीज होत असले तरीही ते त्वचेवरील छिद्रे देखील बंद करतात. म्हणून वर्कआउटनंतरचे माझे स्किन केअर रूटीन काय आहे ते शेअर करत आहे.’
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये वर्कआउटनंतरच्या स्किन केअर रुटीनबाबत माहिती देताना अमृता सांगते की, ‘मी सर्वांत आधी एक्सफोलिएटिंग जेल चेहऱ्यावर लावते. हे जेल अत्यंत सॉफ्ट आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेला कोणताही त्रास होत नाही. त्यानंतर मी रेमी लॉर क्लिन्सिंग टोनर चेहऱ्यावर लावते. अनेक वर्षांपासून मी हे अतिशय सुंदर टोनर वापरत आहे. आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये टोनर फार महत्त्वाचं असतं. त्यानंतर थंड पाण्यानं मी चेहरा धुऊन घेते.’
चेहरा धुण्यासाठी गरम पाणी न वापरता, थंड पाण्याचा वापर करावा. कारण गरम पाणी त्वचेसाठी चांगले नसते, असे देखील ती व्हिडिओमध्ये सांगते. याशिवाय, तिने कोणकोणत्या प्रोडक्ट्सचा स्किनकेअरसाठी वापर केला आहे, याची देखील माहिती दिली आहे. सेलिब्रेटींच्या आहार, व्यायाम व स्किन केअर रुटीनबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. अमृताच्या व्हिडिओवर देखील अनेक चाहत्यांनी कमेंट करत आम्ही नक्कीच हे रुटीन फॉलो करून पाहू, अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.





