Aanchal Singh : अभिनेत्री आंचल सिंह अडकली विवाहबंधनात; शेअर केले खास फोटो
Aanchal Singh : आंचल सिंहची 'ये काली काली आँखे' ही वेब सीरिज खूप गाजली

Aanchal Singh : अभिनेत्री आंचल सिंह विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड मोहित चावला याच्यासोबत लग्न करत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. या लग्न समारंभाचे काही फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
आंचलच्या या वेडिंग फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लग्नासाठी आंचलने पारंपरिक लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. लग्नातील फोटोंमध्ये आंचल आणि मोहित मंडपात आनंदाने विधी पार पाडताना दिसत आहेत. फेऱ्यांदरम्यान दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. लग्नावेळी आंचलचे आई-वडीलही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
आंचल सिंहची पोस्ट
याशिवाय आंचल सिंहगने तिच्या पतीसाठी पोस्ट करत लिहिलं की, “प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा खास दिवस येतो, जेव्हा तिचे वडील तिचा हात जोडीदाराच्या हातात देतात. त्या क्षणी माझ्या मनात खूप गोंधळ होता.
मोहितबद्दल बोलताना आंचल पुढे लिहिते, “मोहितचे बोलते ते माझ्या शब्दांत सांगायचे तर- जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हाच माझ्या मनात हा विचार आला की मी याच मुलीशी लग्न करेन. आणि वेळेनुसार मला तेच मिळालं, ज्याचा शोध मी मनापासून घेत होतो. एक अशी जोडीदार जी घरात आणि आयुष्यात शांतता आणेल, जेणेकरून माणूस जगातील आव्हानांचा सामना करू शकेल.
View this post on Instagram
त्यामुळे हे लक्षात ठेव, हा दिवस आपल्यासाठी असा एक दिवस आहे, जेव्हा आपण आपल्या सर्व लोकांना एकत्र आणू, मज्जा करू आणि आपला आनंद साजरा करू. काय बदलेल? तर फक्त एकच गोष्ट म्हणजे आधी आपण फक्त मित्र होतो, आता ‘पती-पत्नी’ होऊ. जगाच्या नजरेत अधिकृतपणे एकमेकांचे होणे.
आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा बाकी सर्व गोष्टीं व्यतिरिक्त आपल्याला फक्त एकमेकांवरील विश्वासाच्या एका छोट्या आधाराची गरज असते; विशेषतः अशा वेळी जेव्हा जगात इतकं काही घडत असतं. एक अशी व्यक्ती जिचा तुमच्यावर तुमच्या स्वतःपेक्षाही जास्त विश्वास असतो. होय, आमच्यासाठी हेच प्रेम आहे आणि आम्हाला हे प्रेम एकमेकांमध्ये मिळालं, याबद्दल आम्ही खूप कृतज्ञ आहोत. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला सदैव लाभो,” असे तिने पोस्टमध्ये लिहिले आहे.
आंचल सिंह ही ओटीटीचा लोकप्रिय चेहरा आहे. तिची ‘ये काली काली आँखे’ ही वेब सीरिज खूप गाजली. आंचल सिंगने २०१३ साली आंचलने श्री सिद्धार्थ गौतमा या श्रीलंकन चित्रपटातून इंडस्ट्रीत प्रवेश केला. याशिवाय अनेक जाहिरातींमध्येही ती झळकली आहे. Aanchal Singh
हेही वाचा:





