अभिनेता सुयश टिळकला मतदानाचा हक्क बजावता आला नाही; नेमकं काय घडलं?

Actor Suyash Tilak| लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात 11 मतदार संघात मतदान पार पडले जाणार आहे. यात पुणे लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश आहे. मात्र मराठमोळा अभिनेता सुयश टिळकला मतदान करता आले नाही. सुयश टिळकने वेगवेगळ्या बूथवर जाऊन आपले नाव शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्याचे नाव सापडले नाही. याबाबत त्याने सोशल मीडियाद्वारे खंत व्यक्त केली आहे.
सुयश टिळकने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मतदान करता न आल्याबद्दल खंत व्यक्त करत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सुयशने लिहिले की, “गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असलेली सुधारण्यासाठी अर्ज दिला होता. ह्यावेळी सुदैवाने ऑनलाइन पोर्टलवर खूप शोधून शेवटी नाव सापडले असता त्यात तीच चूक होती.”
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिले की, “वोटिंग बूथला सकाळी ७ वाजता पोहचलो. माझ्या ऑनलाइन पोर्टलवरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागीच बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळेच नाव आढळले. म्हणून मी ३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला. अचानक ह्यावेळी काही जणांचा मतदारसंघच बदलला आहे ते कळले. म्हणून वेगळ्या मतदारसंघात पण चौकशी केली शोधाशोध केली.”
मागच्या वेळी देखील सुयशला मतदान करता आले नव्हते. याबाबत त्याने म्हंटले की, ‘गेली अनेक वर्षे मी मतदान न चुकता करत आलो आहे. ह्यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही याची खंत वाटत राहिल.’ त्याची ही सध्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





