‘त्या’ स्क्रीनशॅाट प्रकरणी अखेर अभिनेते सुदेश म्हशीलकरांनी मौन सोडलं; लांबलचक पोस्ट लिहीत सगळंच सांगितलं….

Sudesh Mhashilkar | Prachi Pisat | गेल्या काही दिवसांपूर्वी लोकप्रिय अभिनेत्री प्राची पिसाट हिने सोशल मीडियावर एका फेसबुक चॅटचा स्क्रीनशॅाट शेअर केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. तो स्क्रीनशॅाट पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली होती. प्राचीने इंडस्ट्रीत काम करणाऱ्या एका अभिनेत्याने केलेल्या मेसेजचे स्क्रीनशॅाट शेअर केले होते. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली असल्याचे सबंधित व्यक्तीने चॅटमध्ये लिहिले होते. हे चॅट अभिनेते सुदेश म्हशीलकरांनी केल्याचे दिसत होते. मात्र, आता या प्रकरणावर सुदेश यांनी मौन सोडले असून, त्यांनी याविषयची एक सविस्तर पोस्ट शेअर करत मोठा खुलासा केला आहे.
स्क्रीनशॅाटमध्ये काय होतं?
सुदेश म्हशीलकरांनी अभिनेत्री प्राची पिसाटला मसेज केले होते. या मेसेजमध्ये हल्ली खूप सेक्सी दिसायला लागलीयस…’, ‘तुझा नंबर पाठव ना… तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय…’, असे मेसेजे होते. या चॅटचे स्क्रीनशॅाट प्राचीने शेअर केल्याने ते काळी वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. यासंबंधी आता सुदेश म्हशीलकरांनी त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये फेसबुक हॅक संदर्भात त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सुदेशी यांनी केलेली लांबलचक पोस्ट
खरंतर मी ह्या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मिडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.”
1) “हा मेसेज खरंच मीच केला का?”
तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? — याचा मला पत्ता नाही.
त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे.
आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे — त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
2) “अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप”
मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे — ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं 🤣🤣🤣🤣 असं दिसेल.
जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं.
पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे.
लोकांना अर्धवट माहिती देऊन अश्याप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.
3) “फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?”
माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ ह्या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती. ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.
View this post on Instagram
4) “पाच दिवस उत्तर का दिलं नाही?”
मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम, आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही ह्याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो — कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.
5) “प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?”
माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.
6) “बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?”
‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे — ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात.
त्या आजही आवर्जून आमच्याकडे येता





