Sayaji Shinde : आता मुख्यमंत्र्यांनाच पाण्यात ठेवूया; कर्जत वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे मैदानात
Sayaji Shinde : प्रसिद्ध अभिनेते व 'सह्याद्री देवराई'चे प्रणेते सयाजी शिंदे आता रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात सुरू असलेल्या महाकाय वृक्षतोडीविरोधात थेट मैदानात उतरले आहेत.

Sayaji Shinde : पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि झाडांच्या संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेणारे प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे आता कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात थेट मैदानात उतरले आहेत. (Sayaji Shinde)
कर्जतमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीची त्यांनी पाहणी केली. या वृक्षतोडीच्या निषेधार्थ परिसरातील काही तरुण गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहे. (Sayaji Shinde)
सयाजी शिंदे यांनी थेट उपोषणस्थळी जाऊन या तरुणांची भेट घेतली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सयाजी शिंदे यांनी आपल्या मिश्किल शैलीत सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, आपण जसं घरात एखादं संकट टळावं म्हणून देवाला पाण्यात ठेवतो, तसं आता आपल्या मुख्यमंत्र्यांनाच आपण पाण्यात ठेवूया! आणि त्यांना सांगूया की, हे जे जंगलावर आणि पर्यावरणावर संकट आलंय, त्यातून तुम्हीच आम्हाला वाचवा. (Sayaji Shinde)
सयाजी शिंदे म्हणाले, आज आम्ही या संपूर्ण वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येथे आलो आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निसर्गाची हानी होत आहे. पण, हे जंगल अजिबात तोडू द्यायचे नाही, हीच आमची सर्वांची ठाम भूमिका आहे. (Sayaji Shinde)
तसेच आंदोलकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतानाच, त्यांनी या तरुणांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या तरुणांशी बोलताना त्यांनी दिलेला लढा पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. (Sayaji Shinde)
Sayaji Shinde : “झाडे तोडायला आले तर त्यांना हाकलवून लावा”; अभिनेते सयाजी शिंदे संतापले





