Sayaji Shinde | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देशमुख कुटुंबांसह गावकऱ्यांकडून केली जात आहे. यातच आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधला. आमिर खाननेही घेतली होती धनंजय देशमुख यांची भेट काही दिवसांपूर्वीच पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमिर खानने धनंजय यांची भेट घेतली होती. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख सुद्धा उपस्थित होता. यावेळी आमिरची पूर्व पत्नी किरण रावसुद्धा तिथे उपस्थित होत्या. या भेटीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात आमिर, धनंजय आणि विराज देशमुखसोबत चर्चा करताना दिसत आहे. यानंतर आता सयाजी शिंदे यांनी देखील देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार दरम्यान, 9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. तेव्हापासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आणि विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या घटनेतून दिवसेंदिवस नवे खुलासे केले आहे. Sayaji Shinde | संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्रयत्न कळंब शहरामध्ये एका घरात मनीषा कारभारी बिडवे या मृतदेह आढळला होता. धक्कादायक म्हणजे या महिलेचा वापर संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी करण्यात येणार होता असा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून करण्यात आला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या दोन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने हत्येची कबुली दिली आहे. Sayaji Shinde | हेही वाचा: उत्तराखंडमधील ‘औरंगजेबपूर’ झालं ‘शिवाजी नगर’ ; धामी सरकारने राज्यातील १५ ठिकाणांची नावं बदलली