अभिनेता संग्राम साळवीचे मालिकाविश्वात कमबॅक; ‘येड लागलं प्रेमाचं’मध्ये होणार दमदार एन्ट्री

Actor Sangram Salvi | ‘स्टार प्रवाह’वरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेता संग्राम साळवीची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल सहा वर्षानंतर संग्राम पुन्हा एकदा स्टार प्रवाहवरील मालिकेत पाहायला मिळणार आहे. ‘देवयानी’ या मालिकेमुळे संग्रामला मोठी लोकप्रियता मिळाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.
‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील संग्रामच्या एन्ट्रीचा प्रोमोही समोर आला आहे. यामध्ये तो खलनायक साकारणार असल्याचा अंदाज आहे. यातील त्याचा भारदस्त लुक अनेकांच्या पसंतीस पडला आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील भूमिकेबाबत संग्राम साळवी चांगलाच उत्साही आहे.
View this post on Instagram
‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील भूमिकेबाबत संग्रामने सांगितले की, ‘स्टार प्रवाहच्या कुटुंबासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मला मिळतेय याचा आनंद आहे. ‘देवयानी’ मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आजही प्रेक्षक ‘देवयानी’ मालिकेत मी साकारलेल्या पात्राची प्रशंसा करतात. ‘तुमच्यासाठी कायपण’ हा सुपरहिट डायलॉग बोलून दाखवण्याची मागणी करतात. इतक्या वर्षांनंतरही या पात्राविषयी असलेलं प्रेम पाहून भारावून जातो, असेही संग्राम साळवीने सांगितले.
तसेच संग्रामला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. संग्रामसोबत देवयानी मालिकेत झळकलेली अभिनेत्री शिवानी सुर्वेने देखील पु्न्हा मालिकाविश्वात कमबॅक केले. स्टार प्रवाहवरील ‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेत ती मुख्य भूमिकेत आहे. त्यापाठोपाठ आता संग्राम देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.
हेही वाचा:
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर मायावती नाराज,म्हणाल्या,’लोकांचे जीवन सुखकर होईल का?’





