अभिनेते ‘रणधीर कपूर’ यांची करोनावर यशस्वी मात; काही दिवस घरच्यांपासून लांब राहण्याचा दिला सल्ला…

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीचे जेष्ठ अभिनेते ‘रणधीर कपूर’ यांनी करोनावर मात केली असून, त्यांना नुकतंच डिस्चार्ज देखील मिळाला आहे. 29 एप्रिल रोजी 74 वर्षीय रणधीर कपूर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
View this post on Instagram
दरम्यान, आता रणधीर कपूर यांनी करोनावर पूर्ण पणे मात केली आहे. आणि त्यांना घरी सुद्धा सोडण्यात आले आहे. “मी आता घरी आलो आहे. मला बरे वाटत आहे.. तसेच डॉक्टरांनी मला पुढचे काही दिवस सर्वांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.’ असं डिस्चार्ज मिळाल्या नंतर रणधीर कपूर म्हणाले. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.





