Brand Ambassador of Mantra: अभिनेता रणबीर कपूर ‘मंत्रा’चे ब्रँड अँबेसिडर; ‘द फेस्टिव्हल ऑफ चॉइसेस’ मोहिमेची घोषणा
Brand Ambassador of Mantra : मंत्रा ग्रुपच्या विस्ताराच्या नव्या पर्वाला सुरुवात

Brand Ambassador of Mantra : पुण्यातील रिअल इस्टेट डेव्हलपर मंत्रा ग्रुपने अभिनेता रणबीर कपूर यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. या भागीदारीमुळे मंत्राच्या ब्रँडच्या विस्ताराला आणि नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याच्या योजनांना वेग मिळणार आहे, अशी माहिती मंत्राचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता यांनी दिली.
२००७ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या मंत्रा ग्रुपने १९ वर्षांत निवासी, व्यावसायिक आणि रिटेल क्षेत्रात विस्तार केला आहे. लक्झरी क्षेत्रात जॅकब अँड को ऑपरेटिव्ह सोबत भागीदारी गांती असोसिएट्सपासून मनीष मल्होत्रांपर्यंत पर्यंतच्या सहकार्यामुळे मंत्राच्या प्रीमियम ब्रँडची ओळख मजबूत झाली.
मंत्रा आणि रणबीर कपूर या दोघांनीही २००७ मध्ये आपापल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा आणि सातत्याने विकसित होण्याचा समान धागा या भागीदारीत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मंत्राचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता आणि रणबीर कपूर नव्या ब्रँड फिल्ममध्ये एकत्र दिसणार आहेत. या भागीदारीसोबत मंत्राच्या ‘द फेस्टिव्हल ऑफ चॉइसेस’ या ग्राहक-केंद्रित मोहिमेला सुरुवात होणार आहे.
या मोहिमेत कंपनीच्या विविध प्रकल्पांमधील इन्व्हेंटरी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, मंत्रा आणि बर्गंडी यांच्या माध्यमातून विविध ग्राहक फायदेही दिले जाणार आहेत. मंत्रा ग्रुपकडून नवीन बाजारपेठा आणि मायक्रो-मार्केटमध्ये विस्तार करण्याबरोबरच प्रीमियम व लक्झरी पोर्टफोलिओ मजबूत करण्यावर भर दिला आहे.
हॉस्पिटॅलिटी आणि ब्रँडेड रेसिडेन्सेससारख्या नव्या क्षेत्रांतही कंपनी प्रवेश करत आहे. १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये ८ दशलक्ष चौरस फूटांहून अधिक क्षेत्रफळाचे प्रकल्प पूर्ण केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ७ हजार ५०० हून अधिक कुटुंबांना घरे दिली. कंपनीने मुंबई आणि दुबईच्या बाजारपेठेतही प्रवेश केला आहे.





