अभिनेता राम चरण दुसऱ्यांदा होणार बाबा; पत्नी उपासनाने व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज

Ram Charan and Upasana Konidela | साऊथ सुपरस्टार अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनीने गुडन्यूज दिली आहे. इनस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याचे सांगितले आहे.
“ही दिवाळी डबल सेलिब्रेशन, डबल प्रेम आणि डबल आशीर्वाद देणारी होती,” असं कॅप्शन लिहून उपासनाने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत उपासनाचे कुटुंबीय तिचं औक्षण करताना व अभिनंदन करताना दिसत आहेत. दाक्षिणात्य स्टार व राम चरणचे वडील चिरंजीवी व उपासनाचे वडील आणि इतर नातेवाईक देखील या व्हिडीओत दिसत आहे. Ram Charan and Upasana Konidela |
View this post on Instagram
;
राम चरण व उपासना यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली आहेत. १४ जून २०१२ रोजी हैदराबादमध्ये त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी ते आई-बाबा होणार अशी गुड न्यूज दिली होती. उपासनाने २० जून २०२३ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता त्यांच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. Ram Charan and Upasana Konidela |
हेही वाचा :





