\n

ड्रग प्रकरणात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले –

\n

महाराष्ट्रात मादक द्रव्यांचा व्यापार वाढत असून या प्रकरणाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तारा जुळल्या आहेत काय असा थेट सवाल करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाच घेरण्याचा प्रयत्न केला आहे. नोएडा येथील रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेला आरोपी एल्विश यादव याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी स्वागत केल्याच्या घटनेकडे बोट दाखवत राऊत यांनी हा आरोप केला आहे.

\n

“रेव्ह पार्ट्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सापाच्या विषाची विक्री करणारा या देशातील सर्वात मोठा ड्रग माफिया एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आला. त्याचे स्वागत करून त्याच्या हस्ते तेथे गणपतीची आरती करण्यात आली असे सांगून राऊत यांनी म्हटले आहे की, तुमच्या निवासस्थानी कोण येते याची माहिती घेण्याची बुद्धी मुख्यमंत्र्यांना नाही का? देशाला हे जाणून घ्यायचे आहे कारण हे ड्रग प्रकरण देशाशी संबंधित आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. एल्विश यादव आणि इतर सेलिब्रिटींनी 24 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी उत्सवासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. सध्या एल्विश यादव नोएडा पोलिसांच्या ताब्यात असून त्याला 14 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली आहे.

\n

पोलिसांनी त्याच्या व त्याच्या साथीदारांच्या ताब्यातून पाच कोब्रा, एक अजगर, दोन दुहेरी डोके असलेले साप यासह एकूण नऊ साप जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून विषही जप्त केले आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी या प्रकरणात यूट्यूबर एल्विश यादवच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. त्यावरून संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केला आहे.

\n

काय आहे सापांच्या विषाची तस्करी?

\n

वादग्रस्त युट्युबर एल्विश यादवने सापासोबतचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता. त्यानंतर पीपल फॉर ऍनिमल्स या स्वयंसेवी संस्थेने या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू केला. पीएफएच्या लोकांनी त्यांचे इन्फॉर्मर तैनात केले होते. त्यांनी टोळीच्या काळ्या कारनाम्यांचे पुरावे अतिशय काळजीपूर्वक गोळा केले आणि एल्विशला पकडण्यासाठी पोलीस आणि वनविभागाला कळवल्यानंतर त्यांनी सेक्‍टर-51 मध्ये असलेल्या बॅंक्वेट हॉलला वेढा घातला.

\n

पीएफएच्या संस्थापक माजी केंद्रिय मंत्री मनेका गांधी यांनीही याला दुजोरा दिला आहे. विष व्यापार करणाऱ्या टोळीतील पाच आरोपींसाठी सापळे रचले. त्यांच्याकडून 9 साप आणि 20 मिली विष जप्त करण्यात आले आहे.

\n

वास्तविक, यूट्यूबर एल्विश यादवने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अजगरसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ पाहून पीएफए सतर्क झाली. पीएफए आपल्या माहिती देणाऱ्यांना एल्विशच्या मागे सोडले. त्यानंतर काही दिवसांनी मथुरेत विषाच्या आठ व्यापाऱ्यांना दुर्मिळ प्रजातीच्या सापांसह अटक करण्यात आली. आठही आरोपी रेव्ह पार्टीत साप घेऊन जात होते. यानंतर पीएफए तस्करीचा तपास सुरू केला.

\n

दरम्यान, याबाबत माहिती देणाऱ्या पीएफए सदस्य गौरव गुप्ताने एल्विश यादव यांच्याशी या कार्यक्रमाबाबत चर्चा केली. संभाषणानंतर एल्विशने त्याच्या एजंटचा नंबर दिला. गुप्ताने आपली ओळख लपवून एजंटशी चर्चा केली. या संभाषणादरम्यान संबंधित एजंटने एल्विशचे नाव सांगितले. त्यानंतर साप आणण्याचा सौदा करण्यात आला. अवघ्या 21 हजार रुपयांत हा सौदा झाला. एजंटने आपले नाव न सांगता, बोलत असलेल्या पीएफए सदस्याला सांगितले की, तो असा साप आणणार आहे की पाहून सर्वांना आनंद होईल. त्यांच्या खात्यात पाच हजार रुपयेही ट्रान्सफर केले.

\n

त्यानंतर गुरुवारी सेक्‍टर-51 येथील सेवरॉन बॅंक्वेट हॉलमध्ये येण्याचे निश्‍चित झाले. तेथे पोहोचल्यानंतर पूर्ण पडताळणी केल्यानंतर पीएफएने वनविभाग आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर टोळीतील पाच जणांना 9 साप आणि 20 मिलीच्या विषासह पकडण्यात आले. एजंट राहुल (32) यांच्यासह तितुनाथ (45), जयकरण (50), नारायण (50) आणि रविनाथ (45) यांना पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"बिग बॉस 2 विजेता ‘एल्विश यादव’च्या संबंधात प्रकाश राज यांनी ट्‌विट केले सनसनाटी फोटो; भाजपचे मंत्री…","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/prakash-raj.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Dnyaneshwar Phad","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/actor-prakash-raj-took-a-dig-by-sharing-photos-of-bjp-leaders-with-elvish-yadav-in-rave-party-case#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/prakash-raj.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/actor-prakash-raj-took-a-dig-by-sharing-photos-of-bjp-leaders-with-elvish-yadav-in-rave-party-case#webpage","name":"बिग बॉस 2 विजेता ‘एल्विश यादव’च्या संबंधात प्रकाश राज यांनी ट्‌विट केले सनसनाटी फोटो; भाजपचे मंत्री…","url":"https://www.dainikprabhat.com/actor-prakash-raj-took-a-dig-by-sharing-photos-of-bjp-leaders-with-elvish-yadav-in-rave-party-case","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/actor-prakash-raj-took-a-dig-by-sharing-photos-of-bjp-leaders-with-elvish-yadav-in-rave-party-case#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/11/prakash-raj.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/actor-prakash-raj-took-a-dig-by-sharing-photos-of-bjp-leaders-with-elvish-yadav-in-rave-party-case#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/actor-prakash-raj-took-a-dig-by-sharing-photos-of-bjp-leaders-with-elvish-yadav-in-rave-party-case","name":"बिग बॉस 2 विजेता ‘एल्विश यादव’च्या संबंधात प्रकाश राज यांनी ट्‌विट केले सनसनाटी फोटो; भाजपचे मंत्री…"}}]}}}

बिग बॉस 2 विजेता ‘एल्विश यादव’च्या संबंधात प्रकाश राज यांनी ट्‌विट केले सनसनाटी फोटो; भाजपचे मंत्री…