‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अभिनेता निखिल राऊत झाला बाबा; शेअर केले फोटो

Actor Nikhil Raut | अभिनेता निखिल राऊतची झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका लोकप्रिय ठरली. यातील त्याची निगेटिव्ह भूमिका देखील चांगलीच गाजली. यानंतर आता निखिल राऊतने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेता निखिल राऊत बाबा झाला आहे. २७ मे २०२४ ला निखिलच्या पत्नीने गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर पत्नीसह बाळाचे फोटो शेअर केले आहे.
निखिल राऊतने बाळासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, “आमच्या लाडक्या मुलाच्या जन्माची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, 27 मे 2024 ला त्याचा जन्म झाला. आमच्या बाळाला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम द्या. आम्ही सूर्या हॉस्पिटल सांताक्रूझ पश्चिम येथील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांचे आणि विशेषत: डॉ. अमीत पत्की सरांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो, ज्यांच्या कौशल्याने आणि अथक प्रयत्नांमुळे हा आनंदाचा प्रसंग शक्य झाला. श्री स्वामी समर्थ”, असे त्याने पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला आहे. निखिलने ही पोस्ट शेअर करताच त्याच्या सेलिब्रिटी मित्रांसह चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. Actor Nikhil Raut |
View this post on Instagram
निखिल राऊतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ‘काहे दिया परदेस’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत त्याने साकारलेला मोहित परबची भूमिका सगळ्यांना आवडली होती. याशिवाय निखिलने फर्जंद, फत्तेशिकस्त, बंपर लॉटरी या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. तसेच त्याने नाटकांमध्येही काम केले आहे. Actor Nikhil Raut |
हेही वाचा:





