कमल हासन यांचा ‘इंडियन 2’ चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज; कधी आणि कुठे पाहता येणार?

Indian 2 Will Release On OTT| अभिनेता कमल हासनचा ‘इंडियन 2′ हा चित्रपट मागील महिन्यात प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कमल हासन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘इंडियन’ हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी या सिनेमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र या चित्रपटाचा सीक्वेल ‘इंडियन 2’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यास अपयशी ठरला. यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘इंडियन 2’ हा चित्रपट 9 ऑगस्टला ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. ‘इंडियन’ चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये कमल हासन यांच्याबरोबरच सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह, प्रिया भवानी शंकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले आहेत.
View this post on Instagram
एस. शंकर यांच्या ‘इंडियन 2’मध्ये कमल हासन हे सेनापती व चंद्रू या दुहेरी भूमिकांमध्ये दिसले आहेत. रविवारी, नेटफ्लिक्सने जाहीर केले की, ‘इंडियन 2’ त्यांच्या OTT प्लॅटफॉर्मवर हिंदी वगळता इतर भाषांमध्ये प्रीमियर करेल. इंडियन 2 चित्रपट 9 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे हा चित्रपट हिंदी भाषेत कधी प्रदर्शित होणार, याबद्दल नेटकरी विचारणा करताना दिसत आहेत.
दरम्यान कमल हासन यांचा ‘इंडियन 2’ चित्रपट 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात केवळ 147 कोटींची कमाई केली आहे. एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला सिनेमागृहानंतर ओटीटीवर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:





