अभिनेता इमरान खानचे कमबॅक; ‘या’ अभिनेत्रीसोबत दिसणार मुख्यभूमिकेत

Imran Khan | अभिनेता इमरान खानने ‘जाने तू या जाने ना’ सिनेमातून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो काही सिनेमांमध्ये दिसला आणि गायब झाला. आता तो पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक दानिश असलमच्या आगामी सिनेमात इमरान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात इमरान खानसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
एका मुलाखतीत इमरान खान म्हणाला, “माझा हा सिनेमा ब्रेक के बाद सारखाच आहे. हा सिनेमा दानिश आणि माझ्या आयुष्यातील अनुभवांवर आहे. दानिशचं लग्न झालं आहे तर माझा घटस्फोट झाला आहे. हा एक वैयक्तिक प्रोजेक्ट आहे. सर्वांनी मिळूनच भूमीची निवड केली. सेटवर तिच्या असण्याने खूप मजा आली. माझ्यासाठी या सिनेमाचा सेट करिअरमधला सर्वात मजेशीर सेट होता.” सिनेमाचं शूट पूर्ण झालं असून आता पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु आहे. लवकरच सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा होणार आहे. Imran Khan |
View this post on Instagram
इमरान खान २०१५ साली शेवटचा ‘कट्टी बट्टी’ सिनेमात दिसला होता. यानंतर त्याने अभिनयातून ब्रेक घेतला. मधल्या काळात तो घटस्फोटामुळे चर्चेत होता. आता पुन्हा एकदा इमरानने जय्यत तयारी केली आहे. Imran Khan |
हेही वाचा :
“महिलांना १०,००० रुपये देण्यासाठी NDA कडून वर्ल्ड बँकेचे पैसे खर्च” ; पीकेच्या पक्षाचा मोठा दावा





