Actor Arbaaz Shaikh : ‘सैराट’मधील सल्ल्या लग्नबंधनात अडकणार? गर्लफ्रेंडचं नाव समोर; फोटो व्हायरल!

Actor Arbaaz Shaikh : मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे नागराज मुंजळे यांचा सैराट. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक रेकार्ड तर मोडलेच शिवाय चित्रपटातील कलाकारांना रातोरात स्टार केले. या चित्रपटातील सल्ल्याची भूमिका साकारलेला अभिनेता अरबाज शेख याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका बातमीमुळे चर्चेत आहे.
लवकरच तो आपल्या गर्लफेंडसोबत लग्नबंधनात अडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अरबाज हा सोशल मीडियावर सक्रिय असून त्याचे गर्लफेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सिमरन असे त्याच्या गर्लफेंडचे नाव आहे. सैराट या चित्रपटाने अरबाजला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्याची राहणीमान उंचवाली. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील खूप मोठे बदल झाले.
View this post on Instagram
अरबाजने सैराटनंतर काही चित्रपटातही कामं केली आहेत. या फोटोंमध्ये अरबाज आणि त्याची गर्लफ्रेंड फिरायला गेल्याचे दिसत आहेत. यामुळे आता दोघेही खऱ्या आयुष्यात एकमेकांची जोडीदार होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. हे दोघे लग्नगाठ बांधणार का हे पाहावे लागणार आहे.
सैराट चित्रपटाची वास्तवादी मांडणीने प्रेक्षकांना भुरळ घातली. १०० कोटींहून अधिकचे रेकॅार्ड ब्रेक करत बॅाक्स अॅाफिसवर कलेक्शन या चित्रपटाने केले. चित्रपटातील संगीताने प्रेक्षकांवर मोहिनी टाकली होती. पण सैराटचा खरा गाभा आहे तो त्याचा शेवट. जो पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.
हेही वाचा: मी दिवसाला 10 तास काम करते: हे कठीण आहे, पण अशक्य नाही; शिफ्ट टायमिंगबद्दल जेनेलिया स्पष्टचं बोलली





