Bharat Gogawale and Aditi Tatkare | रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदासाठी दावा केला आहे. यावरूनच मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात सतत वाद होताना दिसत आहे. खासदार सुनिल तटकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांना डावलून एकाकी कार्यक्रम केला. ज्यामुळे शिवसेना पदाधिकारी चांगलेच संतापले होते. त्यावेळी शिवसेना व गोगावले यांची क्रेझ वाढत असल्याने तटकरे यांच्याकडून असे कार्यक्रम केले जात असल्याचा आरोप शिवसेनेतून झाला होता. तर, महाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धनंजय देशमुख यांना गावात जाऊन दमबाजी केल्याने जिल्ह्यात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. एकीकडे कार्यकर्ते हमरी-तुमरीवर उतरले असतानाच दुसरीकडे मात्र मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले एका कार्यक्रमात एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या रायगडमध्ये ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद युती तुटण्यापर्यंत आला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादीशी युती नाहीच अशी भूमिका घेतली आहे. ज्यानंतर राष्ट्रवादीने देखील पलटवार करताना आम्हाला देखील शिवसेनेची गरज नाही असे म्हटले होते. एकीकडे जिल्ह्यातील अशा पद्धतीने राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे मात्र नेतेमंडळी एकाच मंचावर एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे. Bharat Gogawale and Aditi Tatkare | रायगड जिल्हा रोजगार मेळाव्यात नेतेमंडळी एकत्र दरम्यान, अलिबागमध्ये शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या रायगड जिल्हा रोजगार मेळाव्यात मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे पुन्हा एकदा एकत्र आले. एकाच वेळी दोन्ही नेत्यांनी व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी दोघांनी मिळून जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी,प्रशासकीय यंत्रणा जितकी सक्षम तितक्या गतिमान सेवांचा लाभ लोकांना अधिक मिळत असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले. Bharat Gogawale and Aditi Tatkare | हेही वाचा: Pune Crime : धक्कादायक! स्कुटरचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक वादातून घरात घुसून तरुणाचा खून