Nagar | आचारसंहितेचा भंग झाल्यास होणार कारवाई

नगर, (प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. नगर जिल्ह्यातील १२ मतदार संघात मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. ३७ लाख ६० हजार ५१२ मतदार आहे.
विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाईसाठी पथके तैनात करण्यात आले आहेत, अशी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,
निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर रोडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील १२ मतदार संघात 19 लाख 36 हजार 900 पुरूष मतदार आहेत.
तर 18 लाख २३ हजार ४११ महिला- तर तृतीयपंथी- 201 मतदार आहेत. या मतदारांसाठी 3 हजार 763 मतदान केंद्र राहणार आहेत. २२ आॅक्टोबरला अधिसुचना जारी होणार आहे.
नामनिर्देशन भरण्याचा अंतीम दि. २९ आॅक्टोबर तर अर्ज छाननी ३० आॅक्टोबरला होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी ४ नोव्हेंबर तर २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबरला त्या त्या मतदार संघात होणार आहे.
आचारसंहिता लागू: कक्ष कार्यान्वित
विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होताच नगर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १२ मतदारसंघात निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिली.
15 हजार जणांवर होणार प्रतिबंधक कारवाई
आगामी विधानभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे 15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे. तसेच काही जणांवर तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.
तर काहींवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 15 हजार जणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
उमेदवाराला निवडणुकीची खर्च मर्यदा 40 लाख
विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम 10 हजार व अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम 5 हजार रुपये आहे. तसेच उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा 40 लाख इतकी आहे.
निवडणुकीसाठी 9 हजार 890 बॅलेट युनिट पेपर
विधानसभा निवडणुकीसाठी 8 हजार 531 बी.यु., 4 हजार 779 सी.यु, 5 हजार 155 व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहेत. त्याचे प्रथमस्तरीय तपासणी प्रशासनाकडून केली आहे. सर्व विधानसभा मतदारांसाठी वापरण्यात येणार्या इव्हीएम मशीन व्हीव्ही पॅट मशिन्स जोडण्यात येणार आहेत.
1 हजार 867 मतदान केंद्राचे होणार वेब कास्टिंग
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निश्चित केलेल्या मतदान केंद्राच्या 50 टक्के मतदान केंद्राचे वेब कास्टिंग करण्याबाबत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत.
त्याप्रमाणे जिल्ह्यातील 3 हजार 763 मतदान केंद्रापैकी 1 हजार 884 मतदन केंद्राचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.
आदर्श आचारसहिंतेचा भंग केल्यास होणार कारवाई
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विनापरवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी बॅनर, अथवा फलक लावणे,
झेंडे लावणे, व इतर कारणाने मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातली आहे. तसेच ज्या राजकीय पक्ष अथवा उमेदवार यांनी सार्वजनिक मालमत्तेवरर पोस्टर्स, भिंतीपत्रके तातडीने हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.





