Rahul Narvekar : “कागदपत्रांच्या पडताळीबाबत कारवाई सुरू’ – राहुल नार्वेकर
Updated On:

मुंबई – कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. पण कोणतीही घाई देखील होणार नाही. जेणेकरून गडबडीत निर्णय घेऊन कोणावर अन्याय करणार नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दिली आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, मी यापूर्वी देखील सांगितले की, कारवाई लवकरात लवकर होणार आहे. कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. पण कोणतीही घाई देखील होणार नाही. जेणेकरून गडबडीत निर्णय घेऊन कोणावर अन्याय करणार नाही.
तसेच सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीतील आदेशाची माहिती घेईन. मला आतापर्यंत कोणत्याही आदेशाची प्रत मिळालेली नाही. मला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर त्या विषयी माहिती घेऊन, योग्य निर्णय घेईन आणिपुढील कारवाईबाबत निर्णय घेईन, असे त्यांनी सांगितले.





