कंगना ऍक्शन पॅक्ड ‘धाकड’ चित्रपट होणार ‘या’ दिवशी रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला होता. यामध्ये कंगनाचा दमदार ऍक्शन लुक दिसून आला. आता या बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून येत्या 2 ऑक्टोबर 2021 ला प्रदर्शित व्हायची शक्यता आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टिझरवरून हा एक ऍक्शन पॅक्ड धमाका असणार यात किंचितही शंका नाही.
View this post on Instagram
‘धाकड’ चित्रपटात कंगना बरोबर बॉलिवूड अभिनेत्री तब्बू देखील दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सोहेल मक्काई यांनी केली असून, पुढील वर्षी (2020) दिवाळीत हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेता राजकुमार राव आणि कंगणा यांचा ‘जजमेंटल है क्या’ सिनेमाला प्रेक्षकांनी पाठ दाखविली असली तरी कंगणाच्या ‘धाकड’ चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.





