पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 99 हॉटेलांवर कारवाई
Updated On:

पुणे – पुणे जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 99 हॉटेलांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. दि. 7 ते 20 ऑक्टोबरदरम्यानची ही कारवाई आहे.
पुणे शहरात 61, पिंपरी-चिंचवडमध्ये 13 व पुणे ग्रामीणअंतर्गत 25 हॉटेलांवर कारवाई केली.
प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान 9 लाख 90 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे बुधवारी सांगण्यात आले.
दरम्यान, वारंवार नियमाचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलचालकांवर परवाना निलंबीत करण्यात येणार असल्याचा इशारा उत्पादन शुल्क विभागाने दिला.





