माणमध्ये गौणखनिज उत्खननप्रकरणी कारवाई
Updated On:

सातारा, -माण तालुक्यातील हिंगणी येथे गौण खरेदी उत्खनन प्रकरणी कारवाई करून, मंडलाधिकाऱ्यांनी एक कोटी पाच लाख रुपये किमतीचे तीन डंपर अणि एक पोकलेन मशीन जप्त केले आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिंगणी, ता. माण गावच्या हद्दीतील ढोकमोड-राजेवाडी तलावाच्या ठिकाणी सोमवारी (दि. 28) रात्री 11.30 ते 12 या सुमारास अवैधरित्या गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी भाऊसाहेब नामदेव माने (रा. हिंगणी, ता. माण) याच्यासह सात ते आठ जणांच्या विरोधात मंडलाधिकाऱ्यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. ए. वाघमोडे तपास करत आहेत.





