अॅक्शन ड्रामा अॅन्ड रोमान्स! ‘ही’ अभिनेत्री पहिल्यादांच टायगरसोबत दिसणार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Nimrit Kaur : अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया पहिल्यांदाच टायगर श्रॉफसोबत एका रोमँटिक चित्रपटातून स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहे. टायगर श्रॉफ आणि निमृत कौर अहलुवालिया पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या फ्रेश जोडीमुळे दोघांच्याही चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
नुकतेच ‘शौंकी सरदार’ या चित्रपटातील निमृतच्या दमदार अभिनयाची प्रशंसा करण्यात आली. तिच्या निरागसतेचे आणि दमदार अभिनयामुळे तिला इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियता मिळत आहे. टायगर श्रॉफ त्याच्या अॅक्शन आणि डान्ससाठी ओळखला जातो. या दोघांची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
या नव्या प्रोजेक्ट संबंधित एका सूत्राने सांगितले की, “शौंकी सरदारच्या यशानंतर निमृतला अनेक नवीन ऑफर येत आहेत. टायगरसोबत एक नवीन केमिस्ट्री आणण्यासाठी तिला या प्रोजेक्टसाठी निवडण्यात आले आहे. निमृत तिच्या आयुष्याच्या या टप्प्यावर खूप उत्साहित आणि कृतज्ञ आहे.
View this post on Instagram
टायगर आणि निमृत यांची जोडी या नव्या प्रोजेक्टसाठी फायनल झाली आहे. मात्र, या नव्या प्रोजेक्टबद्दल फारशी माहिती मिळू शकलेली नाही. परंतु हा एक मोठा मनोरंजनात्मक चित्रपट असून, दोघेही रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे. या प्रोजेक्टचे निर्माते लवकरच या प्रोजेक्टची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. टायगरचा चाहता वर्ग आणि निमृतची वाढती लोकप्रियता यामुळे ही जोडी प्रेक्षकांसाठी निश्चितच खास ठरणार आहे.





