अल्पवयीन शाळकरी मुलीवर दिल्लीत ऍसिड हल्ला; गंभीर जखमी
Updated On:

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे बुधवारी सकाळी अल्पवयीन शाळकरी मुलीवर ऍसिड हल्ला झाला. या हल्ल्यात मुलगी गंभीररीत्या भाजली. तिला उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीतील द्वारका भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला करण्यात आला. साडेसातच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मुलीचा चेहरा गंभीररित्या भाजला आहे. तिच्या डोळ्यातही ऍसिड घुसले आहे.
या प्रकरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, अल्पवयीन विद्यार्थिनीवरील हल्ल्याची माहिती समोर येताच दिल्ली महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.





